[meetyeti] Fwd: Maharashtra Protected Area Update

  • From: YETI <meet.yeti@xxxxxxxxx>
  • To: meetyeti <meetyeti@xxxxxxxxxxxxx>
  • Date: Sat, 24 Oct 2020 18:29:31 +0530

Might be of interest.

For YETI
Debabrata Phukon

---------- Forwarded message ---------
From: Reshma Jathar <reshma.jathar@xxxxxxxxx>
Date: Sat, Oct 24, 2020, 9:53 AM
Subject: Maharashtra Protected Area Update
To: <meet.yeti@xxxxxxxxx>


Might be of interest.
For YETI


Dear Friends,


Apologies for cross-postings.


Please see below for the list of contents and the edit of the new issue of
the Maharashtra Sanrakshit Kshetra Vartapatra Vol. I, No.3, October 2020
(No. 3). Based on the concept of Protected Area Update, this newsletter is
in Marathi.


If you'd like to receive the entire issue as a pdf, please write to me at
marathipaupdate@xxxxxxxxx

Please do considering subscribing to the newsletter and/or making a
donation to keep the newsletter going.



Thanks,

Reshma Jathar

Editor, Maharashtra Sanrakshit Kshetra Vartapatra

c/o Kalpavriksh



*संपादकीय                                                               *

सुसह्य सहअस्तित्त्वासाठी


*संरक्षित क्षेत्रातील बातम्या
       *

*उमरेड-पवनी-कऱ्हांडला व्याघ्र प्रकल्प*

राज्यात आठ महिन्यांत १४ व्याघ्रमृत्यू; उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यात दोन
वाघांच्या झुंजीत एक ठार

*गौताळा औट्रमघाट अभयारण्य*

औट्रमघाटात आढळल्या सह्याद्रीतील वनस्पती

*टिपेश्वर अभयारण्य*

टिपेश्वर अभयारण्यालगत गावांमध्ये दहशत पसरविणारी वाघीण जेरबंद

*ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प*

लम्पीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ताडोबा अंधारीसह बोर, पेंच व्याघ्र
प्रकल्पांत प्रतिबंधात्मक उपाय

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील प्राण्यांसाठी गोंदिया-बल्लारशाह
रेल्वेमार्ग बनला मृत्यूचा सापळा

*ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प**/**टिपेश्वर अभयारण्य*

मारकी-मांगली-२ खाणपट्टा लिलावासाठी खुला; वाघांचा भ्रमणमार्ग धोक्यात

*नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प*

नवेगाव राष्ट्रीय उद्यानातील पर्यटन संकुल स्थानिक समितीच्या ताब्यात देण्याची
मागणी

*नांदुरमधमेश्वर अभयारण्य*

नांदुरमधमेश्वर अभयारण्यातील पक्ष्यांच्या उड्डाणमार्गांचा अभ्यास लवकरच

*पेंच व्याघ्र प्रकल्प*

पेंच व्याघ्र प्रकल्पातील प्राण्यांना महामार्गावरील भुयारी मार्गांचा आधार

*भीमाशंकर अभयारण्य*

भीमाशंकर अभयारण्याभोवती संवेदनशील पर्यावरण क्षेत्र घोषित

*संजय गांधी राष्ट्रीय उद्यान*

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळील आरेच्या जागेसाठी राखीव वन क्षेत्राची
प्राथमिक अधिसूचना जारी

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात खासगी वाहनांना प्रवेशबंदी

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्याचे बोगदे खणण्यास
लवकरच सुरुवात

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ दुर्मीळ स्थलांतरित पक्ष्याची पहिली नोंद

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्यांचा दूरमिती तंत्रज्ञानाच्या
साहाय्याने अभ्यास

*राज्यस्तरीय बातम्या                                 *

माणूस-वन्यजीव संघर्षात राज्यात गेल्या १० वर्षांत ४६६ माणसे मृत्यूमुखी

चंद्रपुरातील माणूस-वाघ संघर्षाबाबत अभ्यासासाठी शासनाची ११ सदस्यीय समिती


वन्य अधिवासात रस्ते बांधकामाबाबत सूचना जारी

राज्यात वन खात्यात दीड हजारांहून अधिक पदे रिक्त

मांडूळ व कासव तस्करी प्रकरणात राज्यात आणखी चार जणांना अटक

तब्बल दोन वर्षांनंतर राज्याच्या वन्यजीव मंडळाची बैठक; अनेक महत्त्वाचे
निर्णय

दोडामार्ग-सावंतवाडी परिसराच्या ‘संवेदनशील पर्यावरण क्षेत्र’ दर्जा प्रकरणी
न्यायालयाची मध्यस्थी

राज्यात पकडलेले वाघ आता गोरेवाड्याऐवजी महाराजबाग प्राणिसंग्रहालयात


जेरबंद वाघांबरोबरच, बिबट्यांच्याही सुटकेबाबत निर्णय घेण्यासाठी समितीचे
पुनर्गठन

*माणूस-बिबट्यासंबंधी वृत्त                                        *

बिबट्यांच्या सर्वाधिक शिकारीत देशात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर


*नाशिक जिल्हा*


दारणा खोऱ्यातील हल्लेखोर बिबट्या नर; जेरबंद माद्यांची सुटका
होणार

*माणूस-बिबट्या संघर्षाचे काही प्रसंग थोडक्यात*

*राष्ट्रीय बातम्या
    *

देशभरात फुलपाखरांची गणना

भारतीय व्याघ्र क्षेत्राच्या ४० टक्के भागावर जैवविविधतेला मारक ‘लँटाना’चे
अतिक्रमण

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या कार्यालयांची पुनर्रचना; देशात १९ एकात्मीकृत
कार्यालये

ईआयए तरतुदीत प्रस्तावित बदलांना जनतेचा विरोध

देशातील एकूण वाघांपैकी एक तृतीयांश वाघ व्याघ्र प्रकल्पांच्या बाहेर


रेल्वेमार्गांसह इतर लहान प्रकल्पांसाठी राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या मंजुरीची
अट शिथिल

देशातील १७ व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांपेक्षा भटक्या कुत्र्यांची संख्या
जास्त

*आंतरराष्ट्रीय बातम्या                               *

प्राणिसंख्येत घट व संक्रामक रोगांमध्ये वाढ – ‘जागतिक निसर्ग निधी’चा अहवाल


*विशेष माहिती*


संरक्षित क्षेत्रांतील संघर्षविषयक नकाशा

*या नव्या बातमीपत्राविषयी*

*दृष्टीकोन
                                                                  *

वन्यजीव आणि वननिवासी – संघर्ष की सहजीवन?


*सुसह्य सहअस्तित्त्वासाठी*

चंद्रपुरातील माणूस-वाघ संघर्षाच्या परिस्थितीचा अभ्यास करून त्यावर तोडगा
काढण्यासाठी राज्य सरकारने समिती स्थापन केली आहे. ऑगस्ट महिन्याच्या
सुरुवातीला महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार
ही समिती गठित करण्यात आली. संघर्षावर उपाय म्हणून वाघांच्या स्थलांतरणाच्या
पर्यायाबाबत पुरेशी सावधगिरी बाळगायला हवी आणि वाघांच्या नसबंदीचा उपाय
निर्वाणीचा म्हणून पाहावा, अशी मंडळाची भूमिका होती. चंद्रपुरातील परिस्थितीवर
काहीतरी उपाययोजना यथावकाश ठरेल. तरीही एक प्रतिषेध कायम राहतो; आधी वाघांची
संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करायचे आणि त्या प्रयत्नांना यश आल्यावर मग
वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या समस्यांवर मात करण्यासाठी वाघांच्या
स्थलांतरणाचा विचार करायचा किंवा नसबंदी करून त्यांची संख्या कमी करण्याचे
प्रयत्न करायचे!

हा प्रतिषेध केवळ महाराष्ट्र व वाघापुरता मर्यादित नाही. देशभरात सरंक्षित
क्षेत्राबाहेर वावरणाऱ्या वाघांची संख्या मोठी आहे. तसेच,  सौराष्ट्रात आशियाई
सिंहाचीही परिस्थिती थोड्याफार फरकाने अशीच आहे.

माणूस-वन्यजीवांचे सहअस्तित्त्व भारतीयांसाठी नवीन नाही; नवीन आहे ते
दिवसेंदिवस अधिवासाचा ऱ्हास होत चालल्याने त्यांचे अती निकट येणे. चंद्रपूर
जिल्ह्यात ताडोबा अंधारी सारखा वाघांना सोयीस्कर अधिवास आहे पण त्याचवेळी
खाणकामही भरपूर आहे, देशाच्या आर्थिक विकासाच्या धोरणाला धरून असलेले
वीजनिर्मिती, रस्ते आदी प्रकल्पही आहेत. त्यामुळे वाघांची संख्या वाढत असली
तरी त्यांच्या अधिवासाचा ऱ्हास सुरूच आहे. परिणामी, माणसे वाघांच्या सातत्याने
जवळ जात आहेत.

परदेशी समाजाच्या तुलनेत भारतीय समाज वन्यप्राण्यांच्या बाबतीत बराच सहनशील
आहे. आपल्याकडे माणूस-वन्यजीव संघर्षात होणारी जीवित व वित्तहानी इतरत्र,
विशेषतः पाश्चात्त्य देशांत होत असती, तर संबंधित वन्यप्राण्याला ठार करावे,
हे सहज ठरले असते. भारतात मात्र एखाद्या वाघ, सिंह किंवा बिबट्याचा माणसांना
उपद्रव होत असला तरी त्या प्राण्याला सरसकट मारून टाकण्याची मागणी
स्थानिकांकडून सहजी केली जात नाही. माणसांवर वारंवार हल्ले व्हायला लागलेच तर
वन विभागाने त्या जनावराला जेरबंद करून घेऊन जावे, असा सूर असतो. सूडबुद्धीने
वाघाच्या शिकारीवर विष टाकणारे, तारेत वीजप्रवाह सोडून वाघाला ठार करणारे असे
करणाऱ्यांचे प्रमाण असे न करणाऱ्यांच्या तुलनेत कमीच आहे.

भारतात माणूस व वन्यजीवांच्या सहअस्तित्त्वाला पर्याय नाही. हे सहअस्तित्त्व
दोहोंसाठी सुसह्य व पर्यावरणासाठी शक्य तितके संतुलित करण्यासाठी दोन बाबी
लक्षात घेणे गरजेचे आहे; एक - वन्यप्राण्यांच्या वाढत्या संख्येला सामावून
घेण्यासाठी आवश्यक अधिवास आहे तिथे कसा राखून ठेवता येईल आणि दोन – इतरत्र
जिथे शक्य आहे तिथे तो कसा सुधारता येईल. संरक्षित क्षेत्रांमध्ये जास्तीत
जास्त वन्यप्राण्यांना सामावून घेण्यासाठी अधिवासात आणखी सुधारणा करता येतील का
? संरक्षित क्षेत्रांना जोडणाऱ्या वन्यजीवांच्या भ्रमणपट्ट्यांमधील
अधिवासाचेही त्या दृष्टीने विशेष व्यवस्थापन करता येईल का? या शिवाय
वन्यप्राण्यांच्या वावराचे प्रमाण जास्त आहे, अशा परिसरात सहअस्तित्त्व सुसह्य
करणाऱ्या उपाययोजना करता येतील का? विकासाची धोरणे ज्यामुळे जमिनीचा वापर
मोठ्या प्रमाणावर व कायमस्वरुपी बदलतो, अशी धोरणेच बदलण्यासाठी काय करावे लागेल
? वन्यजीवांसाठी सोयीस्कर अधिवास विकसित करण्यासाठी विविध कामे करावी लागतील,
उदाहरणार्थ गावाभोवतीच्या परिसरातील निसर्गाचे पुनरुज्जीवन व त्या अनुषंगाने
करावी लागणारी अशा प्रकारची कामे सरकारी योजनांमार्फत करता येतील का? या
योजनांमध्ये स्थानिक समुदायांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देता येतील का?

*पर्यावरण संवर्धनाचा मूलभूत विचार वेगवेगळ्या वैचारिक भूमिकांमधून करणाऱ्या
वाचकांना इथे उपस्थित केलेले प्रश्न नक्कीच पडले असतील, अनेकांनी त्या
अनुषंगाने विचारही केला असेल. या विचारांच्या देवाणघेवाणीसाठी महाराष्ट्र
संरक्षित क्षेत्र वार्तापत्राचे व्यासपीठ वाचकांना उपलब्ध करून द्यायला
आम्हाला अर्थातच आवडेल. तेव्हा, संपादकीय पत्त्यावर पत्र पाठवून किंवा ई-मेल
करून आम्हाला तुमचे विचार जरूर कळवा.*



*महाराष्ट्र संरक्षित क्षेत्र वार्तापत्र*

खंड १, अंक ३, ऑक्टोबर २०२० (क्र. ३)

संपादकः रेश्मा जठार

साहाय्यक संपादकः पंकज सेखसरीया

साहाय्यकः राधिका अघोर

शीर्षक व इतर रेखाचित्रेः Ashvini Menon Visual Design Studio (AMVDS)

प्रकाशकः कल्पवृक्ष

संपादकीय पत्ताः C/o कल्पवृक्ष, अपार्टमेंट ५, श्री दत्त कृपा, ९०८, जिमखाना,
पुणे ४११००४, महाराष्ट्र, भारत.

दूरभाष/फॅक्सः ०२० २५६५४२३९

ई मेलःmarathipaupdate@xxxxxxxxx

संकेतस्थळः http://kalpavriksh.org

टीपः ‘महाराष्ट्र संरक्षित क्षेत्र वार्तापत्रा’त प्रकाशित बातम्या या त्या
त्या बातमीखाली दिलेल्या मूळ प्रकाशनातील बातम्यांवर संपादकीय सोपस्कार करून
प्रकाशित केलेल्या आहेत.

***

‘महाराष्ट्र संरक्षित क्षेत्र वार्तापत्रा’च्या प्रकाशनासाठी अर्थसाहाय्य
दुलीप मथ्थाई नेचर कॉन्झर्वेशन ट्रस्ट c/o फाऊण्डेशन फॉर इकॉलॉजिक सेक्युरिटी
http://fes.org.in/
आणि
अनेक हितचिंतकांच्या वैयक्तिक देणग्या

***

Other related posts:

  • » [meetyeti] Fwd: Maharashtra Protected Area Update - YETI